#बाप
आपण आयुष्यभर आईचं गुणगाण खुप करतो...
पण बिचारा बापाच धावपळं करून रक्ताच पाणी करतो..............
संकट प्रसंगी बापच धावून येतो
आपण फक्त आई-आईच करत बसतो .............
आईकडे असते संस्कारची किल्ली
तर बाप असतो संयमाचा गुरुकिल्ल्ली.............
सदा आठवते जेवण बनवणारी प्रेमळ आई
पण त्याच शिदोरीची सोय हा बापच रोज पाही..........
काटकसर करुन खर्चाला देतो पौकेटमनी
आपण मात्र वापरतो शर्ट-पॅन्ट जुनी रे जुनी...........
घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी
पण मुलांना घेतो नवी साडी, नवी गाडी.................
वयात आल्यावर मुल आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसते मुलांच शिक्षण....पोरीचे लग्न
जिवंतपणी पूर्ण करावी आई वडिलांची सर्व इच्छा
त्यांना समजुन घ्यावं....हीच शेवटची इच्छा ..............